loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबडवे मंडणगड येथे दि. १४ एप्रिल रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

वरवेली (गणेश किर्वे) - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय रत्नागिरी व श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विकास मंडळ आणि मातोश्री हॉस्पिटल मंडणगड व प्राथमिक आरोग्य केंद्र मंडणगड यांच्या संयुक्त विद्यमानाने ज्येष्ठ नागरिक धोरण योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकासाठी आरोग्य तपासणी शिबिर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने दि. १४ एप्रिल २०२६ रोजी आंबडवे मंडणगड येथे वेळ सकाळी ९ ते दुपारी २ वा. आयोजित करण्यात आला आहे. या शिबिरामध्ये खालील तपासण्या व सुविधा प्राप्त होतील.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तज्ञ डॉक्टरांची तपासणी व मार्गदर्शन, रक्तदाब तपासणी, रक्तातली साखर (मधुमेह तपासणी), वजन, स्त्रीरोग तपासणी (महिलांची तपासणी) हाडांची तपासणी, इसीजी, औषधे, अस्थमा दमा तपासणी, आहाराबद्दल मार्गदर्शन, कान नाक घसा तपासणी, डोळे तपासणी ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा जरूर लाभ घ्यावा. या शिबिरासाठी पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, समाजकल्याण मुंबई विभागचे प्रादेशिक उप आयुक्त बाळासाहेब सोळंकी, समाजकल्याण रत्नागिरीचे सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विकास मंत्री संस्था प्रतिनिधी योगेश पाटील, मातोश्री हॉस्पिटल मंडणगडचे डॉ. प्रदीप मुळे, शशिकांत चव्हाण उपस्थित राहणार आहेत. या शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी ९६०४०२०६३८ शशिकांत चव्हाण यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg