loader
Breaking News
Breaking News
Foto

लाचखोरीचा आरोप असलेल्या निरवडेच्या ग्रामविकास अधिकाऱ्याला अटकपूर्व जामीन मंजूर

सावंतवाडी - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केलेल्या निरवडे येथील ग्रामविकास अधिकारी प्रविण दिलीप पोले यांना ओरोस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पन्नास हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीच्या वतीने अ‍ॅड. अनिल कृष्णा निरवडेकर, अ‍ॅड. गणेश चव्हाण, अ‍ॅड. दत्तप्रसाद ठाकूर, अ‍ॅड. केतन जाधव आणि अ‍ॅड. वामन गवस यांनी काम पाहिले. बचाव पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला ५०,००० रुपयांच्या अटीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​तक्रारदाराच्या बहिणीच्या नावातील आडनाव दुरुस्तीचे काम सावंतवाडी तहसील कार्यालयाकडून निरवडे सजाच्या तलाठी कार्यालयाकडे आले होते. हे काम करून देण्यासाठी ग्रामविकास अधिकारी तथा तलाठी प्रविण पोले यांनी २,००० रुपये लाचेची मागणी केली होती, अशी तक्रार दाखल करण्यात आली होती. ​तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे धाव घेतल्यानंतर या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. पडताळणी दरम्यान, २,००० रुपयांवरून तडजोड होऊन १,००० रुपये देण्याचे ठरले. लाचलुचपत विभागाने यासाठी सापळा रचला होता, मात्र प्रत्यक्षात लाचेची रक्कम स्वीकारताना आरोपीने सावध पवित्रा घेत पैसे स्वीकारले नाहीत, ज्यामुळे सापळा कारवाई यशस्वी होऊ शकली नाही. ​पडताळणी दरम्यान लाचेची मागणी सिद्ध झाल्याचे निष्पन्न झाल्याने, पोले यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली होती.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg