खेड (प्रतिनिधी) : मंडणगड तालुक्यातील गोठे गावात पाखाडीवरून गाडी जाऊ न दिल्याच्या वादातून घरात घुसून मारहाण केल्याची गंभीर घटना घडली असून, या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विकास गमरे (वय ५२), सुनील गमरे (वय २३) आणि रोनक मर्चेंडे (वय २२, सर्व राहणार मंडणगड) यांनी ८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १२:३० वाजता गोठे गावात ही मारहाणीची घटना घडवली. पाखाडीवरून गाडी जाऊ न दिल्याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी प्रराज जाधव (वय ३९, रा. गोठे) यांच्या घरात घुसून हल्ला केला.
आरोपींनी त्यांच्या हातातील चौकोनी पाईप आणि लाकडी काठीने फिर्यादींच्या पाठीत, हातांवर व पायांवर मारहाण केली तसेच शिवीगाळ केली. यावेळी बचावासाठी आलेल्या फिर्यादींची बहीण शुक्रांती हिला संशयित आरोपी सुनील गमरे याने लोखंडी पाईपने डोक्यात मारल्याने तिच्या भुवईजवळ जखम झाली. तसेच, फिर्यादींच्या आईला ढकलून देण्यात आले असून त्यात तिला किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेत फिर्यादी आणि त्यांची बहीण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी प्रराज जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाणकोट पोलीस स्थानकात तिघांविरुद्ध गुन्हा दाख आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.























1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)



















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.