loader
Breaking News
Breaking News
Foto

रामपूर केदारनाथांची दि.१४ एप्रिल रोजी चैतावली यात्रा

वरवेली (गणेश किर्वे) - रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण सर्वात मोठी चिपळूण तालुक्यातील रामपूर जागृत ग्रामदेवता केदारनाथांची चैतावली यात्रा मंगळवार दिनांक १४ रोजी रामपूर तळयाचीवाडी सहाण येथे होणार आहे. या चैतावली यात्रेत १५ ग्रामदेवतांच्या पालख्यांची अनोखी स्नेह मिलन भेट, आनंद सोहळा होणार आहे. रामपूर यजमान ग्रामदेवता श्री केदारनाथ, रामपूर चव्हाणवाडी श्री वरदान देवी, देवखेरकी येथील श्री अमृतेश्वर, श्री मानाई ग्रामदेवता, पाथर्डी श्री लिंगू बाई ग्रामदेवता, नवरतवाडी ग्रामदेवता, गोंधळे ग्रामदेवता, वैजी, शिरळ, मालघर ग्रामदेवता, निर्व्हळ ग्रामदेवता, चिपळूण पाग ग्रामदेवता, पिंपळी खुर्द ग्रामदेवता, कोंढे ग्रामदेवता, दळवटणे ग्रामदेवता, पोसरे ग्रामदेवता, कालुस्ते ग्रामदेवता अशा पंधरा ग्रामदेवता पालख्यांची भेट, मोठ- मोठी मेवा मिठाई, खेळणी, हॉटेल, इतर दुकाने चेतावली यात्रेत येतात. भक्तांच्या मनोरंजनासाठी हातखंबा रवळनाथ नमन मंडळाचे नमन होणार आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केदारनाथ सेवा मंडळ अध्यक्ष मनोज चव्हाण, सर्व पदाधिकारी, मुंबई मंडळ अध्यक्ष पी. आर. चव्हाण यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg