loader
Breaking News
Breaking News
Foto

डिजीटल युगात हाताने रंगवलेल्या अंतरपाटांना मागणी वाढली

देवळे (प्रकाश चाळके) - शहरांबरोबरच ग्रामिण भागातही लग्नसराईची धामधूम सुरु आहे. काळ बदलतो तसे रितीरिवाज, परंपरा यात थोडा थोडा बदल होत जातो. सध्या लग्नसराईत नाविन्याचा ध्यास घेतलेली पिढी दिसत असली तरी डिजीटलच्या या जमान्यात मराठी भाषेत हातानी रंगवलेले अंतरपाट लक्ष वेधून घेत आहेत. हाॅल असो मंडप असो, गावाकडच्या अंगणात सजलेला मंडप असो या ठिकाणी केलेली सजावट, सुशोभिकरण नाविण्यपूर्ण असले तरी मंगलाष्टके म्हणताना वधु- वरांच्या मध्ये जो अंतरपाट धरला जातो त्यावर आता हाताने रंगवलेली मराठी अक्षरे लक्षवेधी ठरत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मराठी नावे, शुभ चिन्ह स्वस्तिक, फुलांची कलाकुसर, नक्षीकाम यामुळे लग्नातले पावित्र्य अधिकच खुलून जात आहे. हा ट्रेंड ग्रामिण भागाबरोबरच शहरातही पहायला मिळत आहे. यामुळे पेंटींग करणार्‍या कलाकारांना आपली कला अजून जिवंत आहे, हे सुखकारक चित्र कलाकार पहात आहेत. रुखवतात सुद्घा रेडीमेड वस्तुंपेक्षा घरच्या घरी तयार केलेली नानाविध सामुग्री मांडलेली पहायला मिळत आहे. वधु-वरांच्या जीवनातील हा अनोखा क्षण त्यांच्या सहजीवनात कायम स्मरणात राहील असेच हे काहीसे आहे.

टाईम्स स्पेशल

याबाबत देवरुख येथील पेंटींग करणारे कलाकार प्रवीण हर्डीकर यांनी सांगितले की डिजीटल जमान्यातही आपण गेली दोन-तीन वर्ष हे मराठी अक्षरातील अंतरपाट ऑर्डर प्रमाणे तयार करत आलो आहे. लग्नाबरोबरच व्रतबंध सोहळ्यातही लागणारा अंतरपाट आपण तयार केल्याचे हर्डीकर यांनी सांगितले. यामुळे कलाकारांनाही हुरुप येत आहे असेही त्यांनी नमूद केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg