दापोली (प्रतिनिधी) - भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महोत्सवानिमित्त ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने १४ एप्रिल रोजी दापोलीत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बौद्धजन सेवा संघ, मुंबई, तालुका दापोली-मंडणगड, तसेच जेसीआय दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी दि. १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत दापोली शहरातील चिंतामणी कॉम्प्लेक्स टेरेस, चिपळूण नागरी पतसंस्थेजवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर, केळसकर नाका, दापोली येथे आयोजित करण्यात आले असून या आरोग्य शिबिरात नॅब चिपळूणचे तज्ञ वैद्यकीय अधिकारी नेत्र तपासणी मोतीबिंदू चिकित्सा व शस्त्रक्रिया मार्गदर्शन करणार आहेत. तर औषधांचे मोफत वाटप संदीप नलावडे (विकास अधिकारी) यांचे कडून करण्यात येणार आहे.
शितल फाउंडेशन/अभिनंदन व्हेंचर हे सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रुग्ण सल्ला आदी काम करणार असून सुरज जाधव (को-ऑर्डिनेटर) डॉ. फरहाना सय्यद हे औषध वाटप करणार आहेत. तर माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने खास महिलांसाठी मासिक पाळी स्वच्छता मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये सुनिल देसाई सहसंस्थापक व निशा सावंत यांचा सहभाग असणार आहे. त्याचप्रमाणे बौद्धजन सेवा संघातर्फे मोफत कापडी सॅनिटरी पॅड वाटप करण्यात येणार आहेत. तसेच व्यसनमुक्ती मार्गदर्शन सेवा, समुपदेशन व औषधोपचार यावर ब्रह्माकुमारीज सरिका बहनजी आणि विदया बहनजी ब्रह्माकुमारीज ब्रह्माकुमारीज, दापोली सेवाकेंद्र च्या मार्गदर्शन करणार आहेत. या संपूर्ण मोफत आरोग्य तपासणी शिबिरात डॉ. कुणाल मेहता (MBBS, MS), डॉ. पवन सावंत (Ophthalmologist), डॉ. तुषार भागवत (MS), डॉ. सुयोग भागवत (MBBS, MD), डॉ. अनिल काकडे (Gynecologist), डॉ. अमित क्षीरसागर(BDS), डॉ. पियुष सोनजे (MS Ortho), डॉ. ओंकार बागडे (MDS), डॉ. समर्थ पेंढारे, डॉ. स्वप्निल भोजने, डॉ. महेंद्र पाटील आदी वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत तज्ञ वैद्यकीय अधिकारी रुग्णांची तपासणी करणार आहेत.
शिबिरादरम्यान सोनोग्राफीची गरज भासल्यास डॉ. समीक्षा कुणाल मेहता यांच्या निदान केंद्रात सोनोग्राफीवर २०% सवलत देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी आयु. शरद जाधव ९४०४१५७७३४ / ८४११८२५५५० ,आयु. प्रीतम रूके – ७५८८९३३५५५ , जेसी प्रा. कुणाल मंडलिक – ९०२८६६६९०१ यांच्याकडे संपर्क साधावा आणि ग्रामीण भागातील जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

































1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)



















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.