loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कबुलायतदार गावकर जमिनी सातबारा वाटप

सावंतवाडी (प्रतिनिधी) - गेळे पर्यटन स्थळ विकसित करून रोजगार निर्माण करण्यासाठी शासनाने कबुलायतदार गावकर जमिनी वाटप केल्या आहेत. पर्यटनासाठी कमर्शियल आणि शेती विषयक उपक्रम हाती घेण्यासाठी जमिनी वाटप करताना आनंद होत आहे. सर्वांच्याच प्रयत्नांना यश आले असून आता चौकुळ आणि आंबोली येथील जमिनी भूमिअभिलेख मार्फत मोजून घेवून वन संज्ञा जमिनीसह वाटप करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे प्रतिपादन माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी केले. गेळे पर्यटन स्थळांवर प्रत्येकाला जमीन वाटप करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. गेळे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्व अभियान आणि गेळे येथे शेतकऱ्यांना कबुलायतदार गावकर जमिनी वाटप समारंभ प्रसंगी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसीलदार श्रीधर पाटील, सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, सरपंच सागर ढोकरे, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, जिल्हा परिषद सदस्य शोभा गावडे, आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर, पंचायत समिती सदस्य मायकल डिसोझा, दाणोली पंचायत समिती सदस्य प्रशांत सुकी, चौकुळ सरपंच गुलाब गावडे, उपसरपंच विजय गवस आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्वातंत्र्यानंतरही गेली कित्येक वर्ष रखडलेला गेळे येथील कबुलायतदार गांवकार जमीनप्रश्न निकाली निघाला असून जवळपास २३० जणांना हक्काचा सातबारा मिळला आहे. जवळपास २८८ हेक्टर क्षेत्रात २३० हून अधिक खातेदार आहेत. या सर्वांना आता हक्काचा सातबारा मिळाला आहे. ५५ गुंठे जागेत शेतीसाठी ५० गुंठे, पर्यटन विकासासाठी ५ गुंठे जागेच वितरण करण्यात आले आहे‌. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले. यावेळी विरपत्नी सिताबाई गवस (नेतर्डे), मनोहर बंड, काशिराम गवस, महादेव नार्वेकर, अर्जुन कदम, उत्तम कदम, धोंडी कदम, महादेव पवार व अन्य शेतकऱ्यांना सातबारा वाटप करण्यात आले. त्यांचे सरपंच सागर ढोकरे व उपसरपंच विजय गवस यांनी स्वागत केले. यावेळी तातोबा गवस,मनोहर बंड, आनंद गावडे, नितीन गवस, बाळा गवस, आरती आनंद गावडे, पी डी गावडे, शशिकांत गावडे यांच्यासह शेतकरी व मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg