loader
Breaking News
Breaking News
Foto

जि.प. महिला व बालकल्याण विभागाचा कारनामा, २ वर्षात प्रशिक्षणासाठी तब्बल ४० लाखांचा खर्च

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेत प्रशासकीय राजवटीच्या तीन वर्षांत मंजूर झालेल्या अर्थसंकल्पातील महिला व बालकल्याण विभागातील खर्चाबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने दोन वर्षांत प्रशिक्षणासाठी तब्बल 40 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती आणि हा निधी पूर्णपणे खर्चही करण्यात आल्याचे कागदोपत्री दिसते. मात्र या प्रशिक्षणाचा प्रत्यक्षात महिलांना कितपत फायदा झाला, याबाबत आजही स्पष्ट चित्र समोर आलेले नाही. या योजनेअंतर्गत महिलांना फळ प्रक्रिया तसेच इमिटेशन ज्वेलरी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. कागदपत्रांनुसार सुमारे 440 महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतल्याचे नमूद आहे. परंतु प्रशिक्षणानंतर या महिलांनी व्यवसाय सुरू केला का, त्यांना उत्पन्न मिळाले का, किंवा त्यांच्या आर्थिक स्थितीत काही सुधारणा झाली का, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे खर्च झालेल्या निधीचा प्रत्यक्ष परिणाम काय, यावर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महत्त्वाची बाब म्हणजे दोन वर्षे सलग एकाच संस्थेला हे प्रशिक्षण देण्याची संधी देण्यात आली. निविदा प्रक्रिया, निवड निकष आणि कामाची गुणवत्ता याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित अधिकाऱ्यांकडे या संदर्भात माहिती विचारली असता त्यांनी तपशील देण्यास असमर्थता दर्शवली, त्यामुळे संशय अधिकच बळावला आहे. जिल्हा परिषद अर्थसंकल्पातून खर्च झालेला निधी हा सर्वसामान्यांच्या करातून उभा राहतो. त्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या या खर्चाचा ठोस परिणाम दिसणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात प्रशिक्षणानंतरचा आढावा, लाभार्थ्यांची प्रगती किंवा स्वावलंबनाचा डेटा उपलब्ध नसल्याने पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण झाले आहेत.

टाईम्स स्पेशल

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणाची चौकशी करावी, खर्च झालेला निधी खरोखर महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी उपयोगी पडला का, याचा वस्तुनिष्ठ आढावा घ्यावा, अशी मागणी सर्वसामान्यांमधून पुढे येत आहे. 40 लाख रुपयांचा निधी खर्च करूनही परिणाम अस्पष्ट राहिल्याने प्रशासनाच्या कामकाजावर टीका होत असून या प्रकरणाचा खुलासा लवकर व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg