खेड (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सोमवार दि. १३ एप्रिल २०२६ रोजी रात्री ११ ते १२ या वेळेत कँडल मार्च काढून डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर मंगळवार दि. १४ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता खेड शहरातील जिजामाता उद्यान येथील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ धम्मध्वजारोहण, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन, अभिवादन आणि बुद्ध पूजापाठाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
यानंतर सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत शहरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून, या मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. दुपारी १ ते २ या वेळेत भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, दुपारी २ ते ५ या वेळेत प्रा. सतीश पां. जाधव यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान होणार आहे. तसेच रात्री ९.३० वाजता प्रबोधनात्मक कव्वाली गायनाचा कार्यक्रम रंगणार आहे. याचबरोबर दि. १४ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी २.३० या वेळेत भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी विविध सामाजिक संस्था, संघटना आणि स्थानिक मंडळांचे सहकार्य लाभणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या पत्रकार परिषदेला संघाचे अध्यक्ष अॅड. दिपक केरू हळदे, सरचिटणीस डॉ. अॅड. संतोष देवजी सावंत, स्वागताध्यक्ष मंदार गंगाराम हळदे, सरचिटणीस चंद्रसेन प्रभाकर मोहिते तसेच जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सुरेश तांबे आदी पदाधिकारी उपस्थित होते. खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाच्या वतीने सर्व नागरिक, बंधू-भगिनी आणि तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंती महोत्सव यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

































1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)



















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.