loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचा १९९ वा जयंती उत्सव उत्साहात

दोडामार्ग (तिलारी प्रतिनिधी): बहुजन समाजाला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढून ज्ञानाचा प्रकाश देणारे थोर समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९९ वी जयंती आज 'समाज जागृती मंच, दोडामार्ग'च्या वतीने अत्यंत उत्साहात आणि गौरवपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. न्यू इंग्लिश स्कूल, दोडामार्ग येथे आयोजित या 'अभिवादन सोहळ्या'त समाजप्रबोधनाचा जागर करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून झाली. या सोहळ्याचे अध्यक्षपद समाज जागृती मंचचे अध्यक्ष आयु. दीपक जाधव यांनी भूषविले, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आंबेडकरी चळवळीचे गाढे अभ्यासक योगेश वराडकर उपस्थित होते. यावेळी शासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळाली. यामध्ये दोडामार्गच्या नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, दोडामार्ग पंचायत समितीचे उपसभापती गणेशप्रसाद गवस, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांसह विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी प्रमुख वक्त्यांनी महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रासंगिकता स्पष्ट केली. "आजच्या आधुनिक युगातही या महापुरुषांचे विचार समाजाला दिशा देणारे आहेत," असे मत मान्यवरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. नवोदित पत्रकार प्रथमेश नाईक यांचा सन्मान या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा करण्यात आलेला 'सत्कार'. यामध्ये पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या वस्तुनिष्ठ आणि गतिमान कार्याची दखल घेत 'रत्नागिरी टाइम्स'चे नवोदित पत्रकार प्रथमेश नाईक यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. नाईक यांच्यासह विधीसेवा, समाजसेवा आणि शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेनिफर लोबो यांनी केले, तर सूत्रसंचालन शंकर जाधव यांनी आपल्या शैलीदार भाषणातून प्रभावीपणे सांभाळले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाज जागृती मंचचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी महेश जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्याला दोडामार्ग परिसरातील नागरिक, विचारवंत आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg