loader
Breaking News
Breaking News
Foto

​रुग्णांना समानतेने वागवणे हीच महात्मा फुलेंना खरी श्रद्धांजली - डॉ. कैलास पवार

ठाणे (प्रतिनिधी) - आरोग्य सेवेत कार्यरत असताना प्रत्येक रुग्णाला समानतेने वागवणे आणि समाजातील सर्व स्तरांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे, हीच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांची खरी अंमलबजावणी आहे, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी केले. ​महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. पवार यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक परिवर्तनातील योगदानाचा आढावा घेतला. ते म्हणाले की, "स्त्री शिक्षण, शेतकरी हक्क आणि सामाजिक समतेसाठी फुले यांनी केलेले कार्य आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. समाजातील अज्ञान, विषमता आणि अन्याय दूर करण्यासाठी शिक्षण हेच सर्वात प्रभावी शस्त्र असून त्यांचे विचार आजही समाजाला योग्य दिशा देणारे आहेत." ​या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे, डॉ. अर्चना पवार, डॉ. विश्वास वासनिक, प्रतिभा बर्डे विनोद जोशी, परिचारिका तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा फुलेंच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजसेवेसाठी आणि रुग्णसेवेसाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा निर्धार सर्व उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg