loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या हर्णे पंचायत समिती गणाच्या विभाग प्रमुख पदी संदेश चोगले

दापोली (प्रतिनिधी) - दापोली तालुक्यातील राजकीयदृष्टया अतिशय महत्त्वाच्या असलेल्या हर्णे पंचायत समिती गणातील पाजपंढरी येथील कट्टर शिवसैनिक आणि शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या संदेश चोगले यांची हर्णे पंचायत समिती गणाच्या विभाग प्रमुख पदी शिवसेनेकडून नेमणूक करण्यात आली आहे. हर्णे आणि पाजपंढरी ही दोन मोठया लोकवस्तीची गांवे मिळून हर्णे नावाचा पंचायत समिती गण आहे. हर्णे हे रत्नागिरी जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मासेमारी बंदर असल्याने हर्णे ही एक व्यापारी बाजारपेठ आहे. हर्णे येथे मोठ्या प्रमाणात व्यापार उद्दीम चालतो. शिवाय हर्णे सुवर्णदुर्ग किल्ला, गोवा किल्ला, फत्तेगड तसेच कणकदुर्ग किल्ले आणि मासळी लिलाव पाहण्यासाठी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची येथे सतत जा ये सुरू असते त्यामुळे येथे स्वयंरोजगारासोबतच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली असल्याने येथे बऱ्यापैकी लोकांच्या हातीला काम मिळाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यामुळे विविध ठिकाणांहून येथे नोकरी निमित्त कामगार आले आहेत. त्यामुळे हर्णेचा झपाट्याने विस्तार वाढत चालला आहे. तसेच पाजपंढरी हे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक मासेमारी करणाऱ्या कोळी जमातीच्या लोकवस्तीचे गाव आहे. या गावाचीही मोठी लोकसंख्या आहे. अशा या हर्णे आणि पाजपंढरी हे दोन्ही गाव मिळून पंचायत समितीचा एक गण तयार करण्यात आला आहे. अशा या गणात पाजपंढरी येथील रहिवासी असलेल्या आणि येथील लढवय्या निष्ठावंत शिवसैनिकाच्या खांद्यावर पक्ष संघटनेने हर्णे विभाग प्रमुख पदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. या पदाला ते न्याय देऊन पक्ष संघटन अधिक गतिमान करतील असा शिवसैनिकांना मोठा विश्वास आहे.

टाईम्स स्पेशल

अशा या नव्याने जबाबदारी सोपविण्यात आलेल्या संदेश चोगले यांचा उत्तर रत्नागिरी चे शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन यशस्वी निवडीचे अभिनंदन करत पुढील कारकिर्दीतील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजय जाधव, जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव, विधानसभा क्षेत्र प्रमुख मुजीब रुमाणे, तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, तालूका सचिव नरेंद्र करमरकर, दापोली तालुका संपर्क प्रमुख रविंद्र धाडवे, शहरप्रमुख संदिप चव्हाण, महिला आघाडी तालुका संघटिका सिंधू भाटकर, शुभांगी खोचरे आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg