loader
Breaking News
Breaking News
Foto

मुरुडमध्ये काळी जादू? अंधश्रद्धेला उत, नागरिकांच्या चर्चेचा विषय

कोर्लई (राजीव नेवासेकर) - मुरुडमधील कल्याणी स्टॉप सबनीस आळीकडे जाणार्‍या चौकात हायमास्ट दिव्याच्या खांबाखाली कोणा अज्ञात व्यक्तीने पपईवर टाचण्या टोचून गुलाल लावून टाकलेला दिसून आल्याने आजही अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला आहे. अशा घटना या परिसरात वारंवार घडताना दिसत आहे. सध्या महाराष्ट्रभर भोंदू बाबा खरात त्यासोबतच अंधश्रद्धेला बढावा देणारे अनेक भोंदूबाबांचे प्रकरण समोर येत असताना मुरुडमध्ये घडलेला हा प्रकार पाहून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. परिसरात या काळ्या जादूसंदर्भात उलटसुलट चर्चांना उधाण येत आहे. भरचौकातच हा प्रकार आढळल्याने नागरिकांमध्ये आश्चर्यासोबतच भीतीचे वातावरण आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg