मालवण (प्रतिनिधी) - मालवण दांडी आवार येथील विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) काल रात्री अचानक जळाल्याने या भागाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, लोकप्रतिनिधींचा तत्पर पाठपुरावा आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या युद्धपातळीवरील कामामुळे आज १०० केव्हीचे नवीन रोहित्र बसवून या परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. दांडी येथील ट्रान्सफॉर्मर जळाल्याची माहिती मिळताच, स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पावले उचलली. पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्याकडे या समस्येबाबत तातडीने पाठपुरावा करण्यात आला. नगर पालिकेतील भाजप गटनेत्या अन्वेषा आचरेकर आणि भाजप तालुका उपाध्यक्ष सन्मेष परब यांनी सतत संपर्कात राहून नवीन रोहित्र उपलब्ध करून घेतले.
आज दिवसभर महावितरणचे अभियंता सचिन मेहेत्रे व त्यांच्या पथकाने विशेष परिश्रम घेतले. १०० केव्हीचे नवीन रोहित्र आणून ते आज सायंकाळपर्यंत कार्यान्वित करण्यात आले. कडक उन्हाच्या दिवसात वीज गेल्याने नागरिक हैराण झाले होते, मात्र तातडीने वीज आल्याने सर्वांना मोठा दिलासा मिळाला आहे. जनतेची गैरसोय टाळण्यासाठी आम्ही तातडीने वरिष्ठ पातळीवर संपर्क साधला. राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे काम पूर्ण झाले याचा आनंद आहे असे स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ऐन वेळी धावून येत अवघ्या काही तासांत वीज समस्या मार्गी लावल्याबद्दल दांडी आवार येथील स्थानिक नागरिकांनी राणे कुटुंबीय, भाजप पदाधिकारी आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.