मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे केंद्राने पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर प्रत्येकी 3 रुपयांची वाढ केली आहे. यामुळे अगोदरच महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवत केंद्राने या दरवाढीच्या माध्यमातून महागाईच्या भडक्यात घासलेट टाकल्याची टीका केली आहे.
पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर 3-3 रुपयांनी महाग झाले आहे. दिल्लीत आता पेट्रोल 97.77 रुपये प्रति लिटरने मिळेल. डिझेलची किंमत 90.67 रुपये प्रति लिटर झाली आहे. नवीन दर आज 15 मे पासून लागू झाले आहेत. सुमारे 2 वर्षांनंतर दरांमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी सरकारवर महागाईच्या भडक्यात घासलेट अर्थात रॉकेल ओतल्याची टीका केली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी सरकारच्या कामकाजाचे वाभाडे काढलेत. ते म्हणाले, कॉम्प्रोमाईज इलेक्शन कमिशनच्या आशीर्वादाने सरकार स्थापन झालं ते देशाला महागाई आणि आर्थिक संकटापासून सुरक्षित ठेवण्यासाठी; सत्तेत येऊन इतर देशांतील दरांशी तुलना करून स्वतःचं अपयश झाकण्यासाठी नाही ! सरकारचं काम राज्यकारभार चालवणं, हास्यास्पद तुलना करणे नाही. 2014 पूर्वी तुलना व्हायची ती विकासाची. आपल्यापेक्षा पुढे असलेल्या देशांपासून, प्रेरणा घेण्यासाठी. ती तुलना नेहमीच प्रोत्साहन देणारी होती. आज तुलना होते, इंधन दरांची, कायदा-सुव्यवस्थेच्या बोजवाऱ्याची, प्रशासनाच्या अपयशाची. आणि अशा देशांशी ज्यांचा भारतासोबत कधी उल्लेखही केला जात नव्हता. हीच खरी अधोगती आहे, असे ते म्हणालेत.































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.