मालवण (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र असलेल्या तालुक्यात शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधांसाठीही संघर्ष करावा लागत आहे. मालवण तहसील कार्यालयातील शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून याकडे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप तारकर्लीचे सामाजिक कार्यकर्ते आणि विशेष मागास प्रवर्ग महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुरेश बापर्डेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. मालवण तहसील कार्यालयात सेतू, रेशनिंग, महसूल, समाज कल्याण आणि जमिनीच्या सुनावणीसाठी संपूर्ण तालुक्यातून नागरिक, ग्रामस्थ आणि मुंबईकर पर्यटक येत असतात. मात्र, कार्यालयाच्या मागील कोपऱ्यात असलेल्या शौचालयाची स्थिती भयावह आहे. शौचालयाच्या प्रवेशद्वारापासूनच दुरवस्थेला सुरुवात होते. दरवाजे मोडकळीस आलेले आहेत. आत गेल्यावर पाणी उपलब्ध नसते, ज्यामुळे स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी नसल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून नागरिकांना नाक मुठीत धरून जावे लागते.
बापर्डेकर यांनी पत्रात म्हटले आहे की, तहसील कार्यालयाला लागूनच पोलीस ठाणे, रॉक गार्डन आणि सरकारी गेस्ट हाऊस आहे. इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी नागरिकांची अशी कुचंबणा होणे लाजिरवाणे आहे. अनेकदा कामासाठी येणाऱ्या नागरिकांना तासनतास थांबावे लागते, अशा वेळी नैसर्गिक विधीसाठी कुठे जावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकतो. मालवण तहसील कार्यालयाच्या मागे पुरेशी जागा उपलब्ध आहे. तिथे सुसज्ज आणि सुशोभित शौचालय बांधता येऊ शकते. मात्र, प्रशासन नागरिकांच्या सोयीपेक्षा त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे का? तहसीलदार यांनी या गैरसोयीबाबत जनतेला खुलासा करावा. अशी मागणी श्री. बापर्डेकर यांनी केली आहे. शौचालयाची ही दुरवस्था कित्येक महिन्यांपासून दुर्लक्षित आहे. पर्यटन स्थळ असलेल्या मालवणमध्ये अशा प्रकारच्या मूलभूत सुविधांचा अभाव असणे हे तालुक्याच्या प्रतिमेला तडा देणारे आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन दुरुस्ती आणि पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, या प्रश्नावर तीव्र पावले उचलली जातील, असा इशाराही सुरेश बापर्डेकर यांनी दिला आहे.































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.