loader
Breaking News
Breaking News
Foto

गिम्हवणे दुबळेवाडी ग्रामस्थांची शोभायात्रा जल्लोषात

दापोली (प्रतिनिधी) - दापोली तालुक्यातील गिम्हवणे दुबळेवाडी येथील श्रीराम ग्रामस्थ मंडळ आणि प्रगती महिला मंडळ गिम्हवणे दुबळेवाडी यांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गुढीपाडवा निमित्त गिम्हवणे येथील अमृतेश्वर मंदिर ते गिम्हवणे दुबळेवाडी येथील श्रीराम मंदिरापर्यंत अगदी आनंदाच्या उत्साहात नव वर्षाच्या स्वागतासाठी काढलेली वाजत गाजत सवादय मिरवणूक अर्थातच शोभायात्रा जल्लोषात पार पडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गिम्हवणे दुबळेवाडी ग्रामस्थ मंडळाच्या ऐक्यामुळे आजवर येथील श्रीराम जन्मोत्सव सोहळा कार्यक्रम दरवर्षीच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येथील मंडळ तालूक्यात सुप्रसिद्ध असे मंडळ आहे. असे हे मंडळ क्रिडाविषयक , सांस्कृतिक तसेच आरोग्य निगडीत आणि सामाजिक कार्यक्रम उत्तमोत्तम राबवते तशाच प्रकारे गुढीपाडवा निमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली. या भव्य दिव्य अशा शोभायात्रेला येथील आबालवृद्धांसह सर्वच वयोगटातील सर्वजण सामिल होत मोठ्या उत्साहात सहभागी झाल्याने शोभायात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.

टाईम्स स्पेशल

या शोभायात्रेतील पालखी मिरवणूक तसेच महीला वर्गाने हाती लेझीम घेत ढोल सनई टीमकि वाद्याच्या तालावर मनसोक्त नाचल्या. त्यातच वारकरी मंडळींनी भजने गात कार्यक्रम चांगलाच भक्तीमय केला. शोभायात्रेत फडकवलेल्या भगव्या ध्वजांनी वातावरण पुर्णपणे भारावून गेले होते. असा हा आनंदी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg