वैभववाडी (प्रतिनिधी) - मुलांतील "माणूस" घडविणारी शाळा हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असलेल्या तालुक्यातील पीएमश्री श्री महालक्ष्मी विद्यामंदिर कोकिसरे शाळेने आपल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची परंपरा कायम ठेवत मराठी नूतन वर्षाचा आरंभ असलेल्या गुढीपाडव्याच्या पूर्वदिनी शाळेत व्यसनमुक्तीची गुढी उभारून तंबाखू आणि व्यसनमुक्तीसाठी सर्व विद्यार्थ्यांनी "समाजदूत" म्हणून कार्यरत राहण्याचा संकल्प केला. सर्व विद्यार्थी पारंपारिक महाराष्ट्रीयन वेशभूषेत उपस्थित होते.
यावेळी 'सिंधू फाउंडेशन 'च्या समन्वयक श्रावणी मदभावे व सतीश मदभावे यांनी "तंबाखूचे दुष्परिणाम" या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी तंबाखू व व्यसनमुक्तीवर आधारित काढलेल्या रांगोळ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली घोषवाक्ये हातात घेऊन व्यसनमुक्तीची शपथ घेतली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश बडमे, उपाध्यक्षा आरुषी काजरेकर, मुख्याध्यापक प्रफुल्ल जाधव, तलाठी संतोष कांबळे, पोस्टमास्तर संभाजी पाचंगे, अंगणवाडी कार्यकर्ती तन्वी जाधव, कोतवाल सुभाष सागवेकर, चंद्रकांत सनगर, दीपक सुतार तसेच पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक प्रफुल्ल जाधव, शिक्षक अमोल येनगे, आकांक्षा जाधव, अनिता कुडाळकर, वैभवी बडमे, प्रमिला पाटेकर व पालकांनी विशेष परिश्रम घेतले. ही शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने रचनात्मक उपक्रम राबवून विद्यार्थीहितासाठी आदर्शवत काम करीत असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

















































































































































































































































































.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.