loader
Breaking News
Breaking News
Foto

विद्यार्थ्यांच्या कोलाज चित्रांचे चंदुलाल शेठ हायस्कूल येथे प्रदर्शन

खेड : श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल या प्रशालेच्या मैदानावर शैक्षणिक कट्टा या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात इयत्ता पाचवी व सहावी या वर्गातील मुद्रा व कोलाज चित्राचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. त्याचे उद्घाटन संस्थेचे संचालक संजय बुटाला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभारी मुख्याध्यापक विजय मस्के, पर्यवेक्षक यु.जी. कांबळे, ज्येष्ठ शिक्षक गोविंद राठोड, कलाशिक्षक राकेश देवरुखकर, नगरसेविका हेमा आंबुर्ले (खेडेकर) व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी या प्रदर्शनातून पाच पारितोषिक विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निसर्गाच्या सानिध्यात आपल्या दृष्टीपटलावर अनेक रंगांची किरणे आपल्याला पहावयास मिळत असतात अशाच हेतूने इयत्ता पाचवी व सहावीतील विद्यार्थ्यांनी कापडाचे रंगीत तुकडे ,पेपर, टाकाऊ वस्तु, याचे एका योग्य आकारात सृजनशीलतेत रचना करून कोलाज निर्मिती केली होती. या चित्राचे प्रदर्शन हे शाळेच्या मैदानावरील शैक्षणिक कट्टा या ठिकाणी प्रदर्शन मांडण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या खुल्या वातावरणात हे कलाप्रदर्शन पाहावे या हेतूने याचे आयोजन करण्यात आले होते. हे चित्रप्रदर्शन प्रशाळेतील विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना आणि इतरांसाठी पहावयास व योग्य अशा किमतीत विक्रीसाठी खुले ठेवण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg