मुंबई - मनसेचा 20 वा वर्षापनदिव व गुढी पाडवा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर जोरदार भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी राज्याचा विकास, राज्यावरील कर्ज, नोकरी, वाहतूक कोंडी यावरून सरकारवर जोरदार हल्ला केला. त्यांनी इराण-इस्रायल युद्धावर भाष्य करताना मोदी सरकारलाही सुनावलं. मोदी सरकारने इराणला पाठिंबा द्यायला हवा होता, यात सरकारने चूक केली आहे. या चुकीचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत, अशी भीतीही व्यक्त केली आहे. राज ठाकरे म्हणाले की, सध्या सगळीकडे भीषण परिस्थिती आहे, एक प्रकारची धाकधूक लागलेली असते. अन्न शिजवायला गॅस मिळत नाहीय. लोकांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. खरं तर युद्ध सुरू असताना काही गोष्टी आपल्याकडून राहून गेल्या. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राहून गेल्या. इराण इतकी वर्षे आपल्याला साथ देत होता.
हा देश जम्मू काश्मीरच्या प्रश्नावर नेहमी आपल्या पाठीशी उभा राहिला, त्या देशाच्या पाठीमागे आपण राहिलो नाहीत. याचा आपल्याला भविष्यात निश्चितच त्रास होणार. इराणवरती हल्ले होत असताना आपण इराणला साथ द्यायला हवी होती. आपल्या देशामध्ये येणारं बरचसं तेल इराणहून येतं. ते आपल्याला तेल रुपयात देतात. खामेनेई गेल्यानंतरही आपल्या पंतप्रधानांनी कुठलेही निषेधाचे एकही निवेदन काढले नाही. हल्ल्यावरही कुठले निवेदन दिले नाही, अडचणीत असतानाही त्यांना साथ दिली नाही. याचा भविष्यात आपल्याला त्रास नक्कीच होणार. या देशात काय चाललंय, लोक कुठे निघालेत... कुणाला काही पत्ता नाही. असे राज ठाकरे म्हणाले. बातम्या दाखवू नयेत, यासाठी दबाव टाकला जातो आणि पत्रकारांना नोकरीवरून काढण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे नागरिकांपर्यंत खरी माहिती पोहोचत नाही. आज लोकांनी प्रश्न विचारू नये यासाठी त्यांना सातत्याने करमणुकीत गुंतवून ठेवलं जात आहे, आयपीएल, कुठले तरी पिक्चर आणि इतर माध्यमातून गुंतवून ठेवलं जातंय. त्यामुळे पहिल्यांदा इन्स्टाग्राममधून बाहेर पडा, असे राज ठाकरे म्हणाले.
राज्याच्या आर्थिक स्थितीवर बोलताना त्यांनी सांगितले की, आपल्याला तीन ट्रिलियन इकॉनॉमी करणार असं मुख्यमंत्री म्हणतात. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राज्यावर सुमारे 2 लाख कोटींचे कर्ज होते, ते आता वाढून ११ लाख कोटींवर पोहोचले आहे. कुठं चाललोय आपण. ‘विकासा’च्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी शहरांमधील वाढते ट्रॅफिक, अतिक्रमणांनी भरलेले फुटपाथ आणि कमी होत चाललेली मैदाने याकडे लक्ष वेधले. आपल्या राज्यात तीन वेळा कर्जमाफी झाली, पण शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्याही आपल्याच राज्यात होतात. हे दुर्दैवी असल्याचं राज ठाकरे म्हणाले. हे फक्त भारतात नव्हे तर जगभरात सुरू आहे. सर्वसामान्य माणसांनी मोबाईलमध्ये, करमणुकीमध्ये अडकून राहावं, मग कुणीही विचार करणार नाही. पूर्वी लोक रस्त्यावर यायचे, पण आता मोबाईलवर निषेध व्यक्त केला जात आहे. माध्यमांची वाट लावून टाकली आहे. सरकारला विरोध केला तर जाहिराती बंद करू अशी धमकी दिली जाते. या अशा विचित्र परिस्थितीमध्ये देश अडकला आहे.






































































































































































































































































.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.