loader
Breaking News
Breaking News
Foto

भागोजीशेठ कीर यांच्या पुतळ्याजवळ प्रकाशव्यवस्था करण्यासंदर्भात उबाठाचे निवेदन

रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथे बसविण्यात आलेल्या रत्नागिरी भूषण भागोजीशेठ कीर यांच्या नव्याने बसविण्यात आलेल्या पुतळ्याजवळ तातडीने प्रकाश व्यवस्था करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी प्रसाद सुरेश सावंत यांनी केली आहे. यासंदर्भात रत्नागिरीच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांच्यासोबत युवासेना शहर प्रमुख आशिष चव्हाण, नाचणे विभाग समन्वयक रितेश लोखंडे, शिवसेना शाखाप्रमुख प्रसाद रायगंकर, ओमकार कारेकर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नगराध्यक्षांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "रत्नागिरी भूषण भागोजीशेठ कीर यांचा पुतळा साळवी स्टॉप येथे बसविण्यात आला आहे, हे स्वागतार्ह आहे. भागोजीशेठ कीर यांना भंडारी समाजाबरोबरच बहुजन समाजामध्ये मानाचे स्थान आहे. त्यामुळे त्यांचा नुसता पुतळा उभारून चालणार नाही तर त्याची पावित्र्यता राखणेही तितकेच गरजेचे आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळी हा पुतळा दिसतच नाही ही शोकांतिका आहे. त्यामुळे तातडीने या ठिकाणी प्रकाश व्यवस्था करण्यात यावी अशी आपणाकडे या निवेदनाद्ववारे मागणी करत आहे." यासंदर्भात नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली यावर लवकरच उपाययोजना करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg