loader
Breaking News
Breaking News
Foto

डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महिला दिन उत्साहात साजरा

पाली (रत्नागिरी): स्त्री-पुरुष समानता ही काळाची गरज असून महिलांच्या अंगी असलेल्या जिद्द आणि कर्तृत्वाला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटी संचालित, डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूल, पाली येथे मंगळवार, दिनांक १७ मार्च २०२६ रोजी ’जिद्द - जागर स्त्री शक्तीचा’ हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमातून स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तुषार जाधव (सहाय्यक पोलीस निरीक्षक, रत्नागिरी) आणि दीपिका सवाई राम (पोलीस हवालदार, रत्नागिरी) यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी डॉ. पद्मजा कांबळे मॅडम, अ‍ॅड. सुयोग कांबळे यांनी ’ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. पालकांसाठी अशा माहितीपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी शाळेबद्दल अभिमान व्यक्त केला. यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धा व उपक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम आणि पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमाचे परीक्षण अमित कदम यांनी तर पाककला स्पर्धेचे परीक्षण गिरीश शितप यांनी केले. दोन्ही परीक्षकांनी आपल्या भाषणातून शाळेची शिस्त, नेटके नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे विशेष कौतुक केले.

टाईम्स स्पेशल

या संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार आणि नेटके सूत्रसंचालन श्रेया गोसावी आणि स्नेहल भागवत यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. मुख्याध्यापिका नूतन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमाच्या यशासाठी परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र (अण्णा) सामंत आणि संचालिका स्वरूपा सामंत यांच्या प्रेरणेतून पार पडलेल्या या कार्यक्रमाचे पालकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg