loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

खेड (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिनानिमित्त भक्तीमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री अक्कलकोट दर्शन यात्रा ग्रुप, खेड (रजि.) तसेच श्री स्वामी समर्थ वारकरी सांप्रदाय, खेड-दापोली-मंडणगड यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शुक्रवार दिनांक २० मार्च २०२६ रोजी होणाऱ्या या कार्यक्रमांत सकाळी श्रींचा पादुका अभिषेक व लघुरुद्र होम त्यानंतर श्री सत्यनारायण महापूजा, महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी पालखी दिंडी आणि भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण होणार आहे.

टाईम्स स्पेशल

या धार्मिक सोहळ्यात सर्व स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वामी सेवा, तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. महाप्रसादाची वेळ दुपारी १ वाजल्यापासून ठेवण्यात आली आहे. खेड शहरातील क्षेत्रफळ नगर येथे हा कार्यक्रम पार पडणार असून, भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg