दापोली (सागर गोवळे) - कोकणची परंपरा, ढोल-ताशांचो गजर आणि "सळसळणारं रक्त" काय असता, याचा प्रत्यय काल निगडे गावात पाहायला मिळाले. श्री खेम देव निगडे गावची पालखी दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सानेवर दाखल झाली. पालखी उत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने आबालवृद्धांनी जो जल्लोष केला, तो बघून डोळ्यांचे पारणे फिटले! यंदाच्या पालखीचं खास आकर्षण ठरलं ते म्हणजे गावातले 'तरुण' झालेले म्हातारे. "पालखी नाचवण्याचा आज शेवटचा दिवस" हे ध्यानात ठेवून, काय तरुण अन काय म्हातारे, सर्वांनीच पालखी खांद्यावर घेऊन जो फेर धरला, त्याला तोड नव्हती. घामाच्या धारा वाहत असतानाही, देवाची पालखी नाचवताना कुणाच्याही चेहऱ्यावर थकवा दिसत नव्हता.
सानेवर पालखी दाखल होताच संपूर्ण परिसर भक्तीमय झाला. पुरुषांच्या बरोबरीने महिला वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. गुढीपाडव्याचा सण आणि त्यात गावच्या देवाचा उत्सव यामुळे परिसरात आनंदाचं उधाण आलं होतं. खाद्यपदार्थांची मेजवानी जत्रेत यंदा ठिकठिकाणी खाद्यपदार्थांची दुकाने थाटली होती. चटपटीत खाऊपासून ते पारंपरिक पदार्थांपर्यंत सर्वांचीच रेलचेल होती. लहान मुलांसाठी खेळणी आणि मिठाईच्या दुकानांवर मोठी गर्दी पाहायला मिळाली. एकूणच, भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम या पालखी सोहळ्यात अनुभवायला मिळाला. निगडेवासियांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात हा सोहळा पार पाडून आपली परंपरा जपली आहे.

















































































































































































































































































.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.