loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ आणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णी अनंतात विलीन

ठाणे दि.१५(प्रतिनिधी) : ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ आणि लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचे शुक्रवारी (१५ मे रोजी )पहाटे ४.३० ते ५ वाजण्याच्या दरम्यान दुख:द निधन झाले. त्यांचे वय ६८ होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. मागील आठवड्यात झालेल्या शस्त्रक्रियेनंतर तब्येतीसंदर्भात काही गुंतागुंत निर्माण झाली होती. शस्त्रक्रियेनंतर ते बरे झाले परंतु अचानक त्यांची प्राणज्योत मालवली. आनंद नाडकर्णी यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी ठाण्यातील सरस्वती मंदिर ट्रस्टच्या आवारात सकाळी ११ वाजता ठेवण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले, तसेच नाडकर्णी यांच्या कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन केले. यावेळी खासदार नरेश म्हस्के, ठामपा शिवसेना गटनेते पवन कदम शिवसेनेचे नौपाडा विभागप्रमुख किरण नाकती आणि विविध क्षेत्रातील विविध पक्षातील मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डॉ. नाडकर्णी यांचा जन्म जन्म: १९५८ साली जळगाव येथे झाला.त्यांचं प्रारंभिक शिक्षण जळगाव, अंबेजोगाई, ठाणे अशा विविध ठिकाणी झालं. त्यानंतर ठाणे कॉलेजमध्ये त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. पुढं, सेठ जी. एस. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस (१९८०), आणि के.ई.एम. हॉस्पिटल इथून डिप्लोमा इन सायकॉलॉजिकल मेडिसिन ही पदविका आणि एमडी(मनोविकारशास्त्र) (१९८४) हे वैद्यकीय शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. एमडीच्या परीक्षेत मुंबई विद्यापीठाच्या सुवर्णपदकाचे ते मानकरी ठरले. त्यानंतर, काही काळ त्यांनी ‘केईएम’मध्ये अध्यापनाचं काम केलं. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून मानसोपचारशास्त्र विषयात एमडी पदव्युत्तर पदवी मिळवली.ते गेल्या तीन दशकांपासून मानसोपचार क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत होते. त्यांनी मानसिक आरोग्याची संकल्पना समाजातील जवळपास प्रत्येक संभाव्य स्तरापर्यंत पोहोचवली आहे आणि ते विविध प्रकारच्या कार्यक्षेत्रात काम करत होते.डॉ.आनंद नाडकर्णी हे पुणे येथील 'मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रांचे'ही संस्थापक सदस्य आहेत

डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनामुळे मन ओळखणारा एक संवेदनशील विचारवंत आपण गमावला असल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली मानवी मनाचा वेध घेत समाजाला मानसिक आरोग्य, संवेदनशीलता आणि सकारात्मकतेची दिशा देणारा एक अभ्यासू आणि माणुसकी जपणारा आवाज हरपला असल्याचे ते म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

मन ओळखणारा संवेदनशील विचारवंत हरपला , डॉ. आनंद नाडकर्णीना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची श्रद्धांजली

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg