loader
Breaking News
Breaking News
Foto

आयेशा खोत मुंबई विद्यापीठाच्या बेस्ट स्टुडन्ट प्लॅटिनम गर्ल अवॉर्डने सन्मानित

दापोली (प्रतिनिधी) - दापोली शिक्षण संस्था संचालित दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेजची विद्यार्थिनी आयेशा इनायत खोत हिला मुंबई विद्यापीठाचे २०२४-२५ या वर्षाच्या बेस्ट स्टुडन्ट: प्लॅटिनम गर्ल अवॉर्ड या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या जवळजवळ ९५० महाविद्यालये आणि हजारो विद्यार्थिनीं मधून आयेशाची या पारितोषिकासाठी निवड झाली. या पारितोषिकामध्ये रोख १५ हजार रुपये, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी विद्यापीठाच्या सभागृहात साजरा झालेल्या या कार्यक्रमाला आयेशा खोत हिला विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्रकुलगुरू डॉ. अजय भामरे, विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे डॉ. सुनील पाटील हेही उपस्थित होते. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स या महाविद्यालयात तृतीय वर्ष रसायनशास्त्र या विषयात प्रथम वर्गात पदवी संपादन केलेल्या आयेशा खोत हिने महाविद्यालयाबरोबरच विद्यापीठातही उत्कृष्ट विद्यार्थिनी पुरस्कार पटकावून दापोलीचा झेंडा विद्यापीठात उंच फडकवला आहे. अभ्यासाबरोबरच सहशैक्षणिक आणि इतर शैक्षणिक उपक्रमांमध्ये भाग घेऊन विद्यापीठ, राज्य आणि राष्ट्र पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे.

टाईम्स स्पेशल

आयेशाने यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना स्वप्न पाहणे आणि त्यासाठी जीव तोडून मेहेनत करणे यांचे महत्व अधोरेखित करून आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई वडिलांबरोबरच दापोली अर्बन बँक सिनिअर कॉलेज या आपल्या महाविद्यालयाला आणि तिथून मिळणार्‍या प्रोत्साहन आणि पाठिंब्याला दिले आहे. या कार्यक्रमासाठी, तिचे कौतुक आणि अभिनंदन करण्यासाठी तिच्या आई वडिलांसह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे, उपप्राचार्य डॉ. घनश्याम साठे, डॉ. राजेंद्र मोरे हे मुंबई विद्यापीठात उपस्थित होते. सध्या आयेशा खोत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च या भुवनेश्वर, ओरिसा येथील संस्थेत रसायनशास्त्र या विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहे. आयेशाच्या या यशाबद्दल दापोली शिक्षण संस्थेचे सर्व संचालक, महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg