loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना-भाजप महायुतीकडून नऊ उमेदवार जाहीर

लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा व राजापूरसाठी शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवारांची रविवारी लांजा येथे ९ नावे घोषित करण्यात आल्याने अखेर उमेदवारांची होणारी घालमेल थांबली आहे. शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी महायुतीकडून पहिल्या टप्यातील उमेदवार यादी रविवारी लांजा येथे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. शिवसेना शिंदे पक्षाचे आठ तर भाजपला एक जागा निश्चित करण्यात आली. लांजा नगरपंचायत निवडणूक रिंगणात उमेदवार देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाकडून कमालीची शांतता आणि खबरदारी घेण्यात येत होती. मात्र शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी महायुतीने पाहिले ९ उमेदवार जाहिर केले. महायुतीकडून उमेदवार जाहीर होताच शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पत्रकार परिषदेला शिवसेना (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष राहुल पंडित, भाजप जिल्हाध्य ऍड. दीपक पटवर्धन, राष्ट्रवादीचे बंटी वळंजू, लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत, शिवसेना नेते अविनाश लाड, विधानसभाक्षेत्र प्रमुख सुनील कुरूप, लांजा तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, राजापूर तालुका प्रमुख प्रकाश कोळेकर, प्रसन्न शेट्ये, महेश उर्फ मुन्ना खामकर, सचिन डोंगरकर, भाजप तालुका अध्यक्ष शैलश खामकर, विराज हरमले, रिपब्लिकन सेनेचे अनिरुद्ध कांबळे, हेमंत शेट्ये यासह भाजप, शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. लांजा नगरपंचायत निवडणूकीसाठी शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी महायुतीकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये प्रभाग क्रमांक १ निधी निलेश गुरव (शिवसेना), प्रभाग क्रमांक २ पंढरी बाळकृष्ण माईशेटे (शिवसेना), प्रभाग क्रमांक ३ श्रद्धा संजय तोडकरी (शिवसेना), प्रभाग क्रमांक ४ सानिका समीर जाधव (शिवसेना), प्रभाग क्रमांक ६ योगेश गोपीनाथ कावतकर (शिवसेना), प्रभाग क्रमांक १० सौ. प्रणाली गुरुप्रसाद तेली (भाजप), प्रभाग क्रमांक १३ साक्षी किशोर मानकर (शिवसेना), प्रभाग क्रमांक १४ वैभव यशवंत जाईल (शिवसेना), प्रभाग क्रमांक १७ सौ. शिवण्या शैलेश काळे (शिवसेना) असे एकूण शिवसेना ८ तर भाजपला एक उमेदवार निश्चित करण्यात आले. उर्वरित दुसर्‍या टप्प्यातील यादी लवकरच जाहीर होईल असे शिवसेना जिल्हाध्यक्ष राहुल पंडित यांनी सांगितले. यावेळी शिवसेना (शिंदे) भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार), रिपब्लिकन सेना, आरपीआय महायुतीमधील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg