loader
Breaking News
Breaking News
Foto

मडूरा हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचे येऊर - ठाणे येथे स्नेहसंमेलन

बांदा (प्रतिनिधी) - आयुष्याची गाडी वेगाने धावत आहे. जबाबदाऱ्या, कामाचा ताण आणि काळाच्या झपाट्यात प्रत्येक जण कुठेतरी हरवून गेला आहे. पण या सगळ्यात ज्या कायम आपल्याबरोबर राहतात त्या म्हणजे आठवणी - त्या निष्पाप हास्याच्या, शाळेच्या बाकांवरील खोड्यांच्या आणि मित्रांच्या प्रेमळ गप्पांच्या. याच पार्श्वभूमीवर मडूरा हायस्कूलच्या १९८९ च्या दहावीच्या बॅचने या सगळ्या गोड आठवणींना नवसंजीवनी देण्यासाठी ठाण्यातील येऊरच्या निसर्गरम्य व वातावरणात स्नेहसंमेलनाचं आयोजन केले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कित्येक वर्षांनी एकत्र आलेले हे मित्रमैत्रीणी एकमेकांना पाहताच बालपणीच्या आठवणींच्या सागरात हरवून गेले. कोणी आपल्या शाळेतील गमतीजमती सांगू लागला, तर कोणी त्या काळातल्या छोट्या गोष्टींवर आजही खुश होता. घराकडून येताना आणलेल्या पदार्थांवर सर्वांनी यथेच्च ताव मारला. बरेच मित्र स्नेहसंमेलनासाठी गावातून ठाणेत दाखल झाले होते.

टाइम्स स्पेशल

या स्नेहसंमेलनाने प्रत्येकाच्या मनात पुन्हा एकदा शाळेच्या घंटानादाची आठवण जागवली. जुन्या काळातील मैत्रीचा, निरागसतेचा आणि बंधुत्वाचा सुवास पुन्हा एकदा सगळ्यांच्या हृदयात दरवळला. या भेटीत केवळ आठवणींचा प्रवास नव्हता तर नव्याने जगण्याची प्रेरणाही होती. काळ जरी पुढे सरकत असला तरी मैत्रीचं नातं हे काळाला हरवून टाकणारं असतं हे स्नेहसंमेलनाचे जीवंत उदाहरण ठरले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी जीवनाच्या गर्दीत हरवू नका, या नात्याची ऊब कायम ठेवा, या भावनेने सगळ्यांनी निरोप घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

बालपणीच्या आठवणींचा सुगंध

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg