loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हसळा पोलिसांकडून शांतता समितीची बैठक; दिल्ली बॉम्ब ब्लास्ट पार्श्वभूमीवर सतर्कतेचे निर्देश

म्हसळा – रायगड : दिल्ली येथे झालेल्या बॉम्ब ब्लास्टसारख्या देशविघातक घटनांच्या पार्श्वभूमीवर तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी म्हसळा पोलिसांनी शांतता समितीची विशेष बैठक आयोजित केली. म्हसळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.बैठकीस म्हसळा तालुक्यातील सर्व समाजांचे अध्यक्ष,पदाधिकारी,गणेश मंडळ प्रतिनिधी,प्रतिष्ठित नागरिक,तसेच शांतता समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.दिल्लीतील बॉम्ब ब्लास्टमध्ये जीव गमावलेल्या निरपराध नागरिकांना बैठकीच्या सुरुवातीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी समिती सदस्यांनी १९९३ च्या मुंबई बॉम्ब ब्लास्टची आठवण करून देत सुरक्षा आणि सतर्कतेची गरज पुन्हा अधोरेखित केली.तालुक्याच्या भौगोलिक स्थितीचा विचार करून महत्त्वाच्या ठिकाणी नाका तपासणी वाढवावी,सतर्क गस्त ठेवावी आणि सीसीटीव्ही यंत्रणेला अधिक बळकटी द्यावी अशी सूचना करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

म्हसळा शहरात सुरु असलेल्या सीसीटीव्ही बसविण्याच्या प्रक्रियेला गती देत काही प्रमुख ठिकाणी कॅमेरे तातडीने बसवावेत अशी मागणी उपस्थितांनी केली.आठवड्याच्या शेवटी निर्माण होणारी ट्रॅफिक जॅम समस्या दूर करण्याची विनंती करण्यात आली. तसेच धुम स्टाईलने मोटारसायकल चालविणाऱ्या तरुणांवर कठोर कारवाई करावी अशी नागरिकांची भावना सभेत व्यक्त झाली.बैठकीस माजी सभापती महादेव पाटील,उपनगराध्यक्ष अनिकेत पानसरे, मुस्लिम समाज अध्यक्ष महमदअली पेणकर,उपाध्यक्ष मूब्बशीर जमादार, सलीम उकये,हिंदू समाज सचिव सुशिल यादव,नगरसेवक सुफीयान हळदे,सुहेब हळदे,योगेश करडे,सुरेश कुडेकर, बाबू बनकर,समीर काळोखे,सुहेल घराडे,अनिल बसवत,नाना सावंत,किरण पालांडे,सौरव गोरेगावकर, कांतीभाऊ जैन , हेमंत नाक्ती आदी मान्यवर उपस्थित होते.नागरिकांनी उपस्थित केलेल्या सर्व सूचनांची योग्य दखल घेऊन आवश्यक ती पावले उचलली जातील, असे सहायक पोलिस निरीक्षक रविंद्र पारखे यांनी उपस्थितांना आश्वासन दिले. तसेच शांतता, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज असल्याचे सांगत सर्वांचे आभार मानले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg