loader
Breaking News
Breaking News
Foto

जीजीपीएसमध्ये बालदिन उत्साहात साजरा

रत्नागिरी : रत्नागिरीतील जी.जी.पी.एस च्या ’स्वामी स्वरूपानंद प्री प्रायमरी’ विभागात बाल दिनाचे औचित्य साधून मुलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. विविध प्राण्यांचे, फुलांचे, कार्टूनचे हाताने तयार केलेले मुखवटे मुले घालून आली होती. आकाशात फुगे उडवून बालदिनाची सुरुवात झाली. बालदिनाचे औचित्य साधून शाळेने विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांना शाळेत आमंत्रित केले होते. आजी आजोबांनी आपल्या नातवंडांच्या वर्गात जाऊन मुलांना गाणी, गोष्टी सांगितल्या; त्यांच्याशी गप्पा मारल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी झालेल्या स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना आजी आजोबांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. खास आजी आजोबांसाठी शाळेने विविध खेळांचे आयोजन केले होते. आजी आजोबांनी देखील या खेळांचा मनसोक्त आनंद घेतला. त्यांच्या चेहर्‍यावरच्या उत्साहाने, आनंदाने आजचा कार्यक्रमाची शोभा आणखी वाढवली. मुलांना शाळेकडून खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर, प्रायमरी विभागाच्या अपूर्वा मुरकर आणि प्री प्रायमरी विभागाच्या शुभदा पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाने हा बालदिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg