loader
Breaking News
Breaking News
Foto

रविवारी ११ ते ३ वेळेत आॕनलाईन व आॕफलाईन नामनिर्देशन पत्र सादर करता येणार

रत्नागिरी, दि. 15 :- राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र आदेशान्वये "दि. १५ नोव्हेंबर ते दि. १७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीमध्ये (तीनही दिवस (रविवार दि. १६ नोव्हेंबर २०२५ या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील) दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांना दोन्ही पध्दतीने म्हणजेच संकेतस्थळावर (online) तसेच पारंपरिक (offline) पध्दतीने सुध्दा आपले नामनिर्देशनपत्रे आवश्यक कागदपत्रांसह संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करता येतील" असे आदेशित केले असल्याचे जिल्हा सह आयुक्त नपाप्र वैभव गारवे यांनी कळविले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्र- रानिआ/निका/नप- २०२५ / प्र.क्र.१४ / का. ६, दि :- १४ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या आदेशा अन्वये रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी नगरपरिषद, चिपळूण नगरपरिषद, खेड नगरपरिषद, राजापूर नगरपरिषद या चार नगरपरिषद व लांजा नगरपंचायत, देवरुख नगरपंचायत, गुहागर नगरपंचायत या तीन नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका २०२५ करिता उमेदवारांना "दि. १५ नोव्हेंबर ते दि. १७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीमध्ये (तीनही दिवस),(रविवार दि. १६ नोव्हेंबर२०२५ या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील) दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ वाजे पर्यंत उमेदवारांना दोन्ही पध्दतीने म्हणजेच संकेतस्थळावर (online) तसेच पारंपरिक (offline) पध्दतीने सुध्दा आपले नामनिर्देशनपत्रे आवश्यक कागदपत्रांसह संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करता येतील" यांची नोंद घ्यावी. सदर वेळापत्रकानुसार नामनिर्देशन प्रक्रिया नियमितपणे सुरु राहील.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg