loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणातील पहिले 'भोसले सैनिक स्कूल'चे उद्घाटन ना. नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सैनिक परंपरा असलेल्या सावंतवाडी तालुक्यामध्ये 'भोसले सैनिक स्कूल'चे उद्घाटन होणे हा अभिमानाचा क्षण आहे. यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीच्या या कोकणातील पहिल्या सैनिक स्कूलचे देशाच्या संरक्षणात सहभागी होणाऱ्या सैनिकांना घडविण्यात मोठे योगदान असेल, असा विश्वास माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. ​यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचालित, केंद्रीय संरक्षण मंत्रालय भारत सरकार व सैनिक स्कूल सोसायटी मान्यता प्राप्त कोकणातील पहिले 'भोसले सैनिक स्कूल' चे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भोंसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत भोंसले, अध्यक्षा ॲड. अस्मिता भोंसले, सचिव संजीव देसाई, भोंसले सैनिक स्कूलचे चिफ एक्झिक्युटीव्ह ऑफिसर रत्नेश सिन्हा, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद उपाध्यक्ष ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर, अभाविपचे कोकण प्रांत संघटन मंत्री निरज चौधरकर, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद अध्यक्ष मेजर विनय देगांवकर आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​आमदार दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात व विशेषतः सावंतवाडी तालुक्यात सैनिक स्कूल सुरू होत असल्याबद्दल सार्थ अभिमान व्यक्त केला. डिप्लोमा कॉलेजपासून सुरू झालेल्या भोसले नॉलेज सिटीचा आज वटवृक्ष होताना पाहून आनंद होत आहे. भोंसले सैनिक स्कूल अत्याधुनिक सुविधांनी युक्त असणार असून अच्युत सावंत भोंसले यांच्या 'परफेक्शन' या खासियतीमुळे हा उपक्रम निश्चितच यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्थानिक आमदार म्हणून या संरक्षण मंत्रालयाची मान्यता असलेल्या स्कूलचा आपल्याला अभिमान वाटतो, असे ते म्हणाले. भोंसले सैनिक स्कूलचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत - भोंसले यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले की, मुलांमधील शिस्तीचा अभाव दूर करण्यासाठी सैनिक स्कूल सुरू करण्याची संकल्पना खूप जुनी होती. सैनिकांचा तालुका म्हणून प्रसिद्ध असलेल्या सावंतवाडीसाठी हा विचार महत्त्वाचा होता. यासाठी तीन वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडून मान्यता मिळाली, ही गौरवास्पद बाब आहे. कोकणातील केंद्रीय स्तरावर मंजूरी मिळालेले हे एकमेव व पहिले सैनिक स्कूल ठरले आहे. सैन्यातील अधिकारी कसे घडावेत याचा पाया घालण्याचे काम भोंसले सैनिक स्कूल करेल, याचा संस्थेला अभिमान आहे.

टाइम्स स्पेशल

​या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित प्रमुख अतिथी, पालकमंत्री ना. नितेश राणे तसेच स्थानिक आमदार दीपक केसरकर यांचा संस्थेच्या वतीने यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमर प्रभू यांनी केले, तर भोंसले सैनिक स्कूलचे चिफ एक्झिक्युटीव्ह ऑफिसर रत्नेश सिन्हा यांनी स्कूल संदर्भात सर्वंकष माहिती सादर केली. यावेळी सर्वच क्षेत्रातील मान्यवर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg