loader
Breaking News
Breaking News
Foto

जेसीआय खेडचे अध्यक्ष जेएफडी अमर दळवी यांना जेसीआय इंडिया झोन ११ चे सर्वोत्कृष्ट अध्यक्ष पुरस्कार

खेड (प्रतिनिधी) - जेसीआय इंडिया झोन ११ आयोजित विभागीय परिषदेमध्ये जेसीआय खेडने उल्लेखनीय यश संपादन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या परिषदेमध्ये जेसीआय खेडचे अध्यक्ष जेएफडी अमर दळवी यांना झोनचा सर्वोत्कृष्ट अध्यक्ष हा मानाचा बहुमान प्रदान करण्यात आला. तसेच जेसीआय खेडला उत्कृष्ट लोम २०२५ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. जेसीआय खेडच्या अधिकारी व सदस्यांनी विविध श्रेणींमध्ये चमकदार कामगिरी करत झोनमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यापैकी उत्कृष्ट सेक्रेटरी जेसी कपिल कोळेकर, उत्कृष्ट LO ऑफिसर जेसी हेमंत चिखले, उत्कृष्ट जेसी मेंबर ऑफ झोन जेएफएम मधुर पेठे, उत्कृष्ट न्यू जेसी मेंबर ऑफ झोन जेएफडी डॉ. दिग्विजय पवार याव्यतिरिक्त वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये एकूण १२ पुरस्कारांची कमान जेसीआय खेडने केली असून हा अभूतपूर्व विजय संपूर्ण जेसीआय परिवारासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदरचे सर्व पुरस्कार झोन अध्यक्ष जेएफडी शाबा गावस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या भव्य कार्यक्रमास गोवा राज्याचे मुख्यमंत्री जेसी डॉ. प्रमोद सावंत, जेसीआय इंडिया माजी राष्ट्रीय अध्यक्ष जेएफएस रीकेश शर्मा, झोन ११ माजी अध्यक्ष अतुल गोंधकर, अमोल क्षिरसागर, इशान उसापकर, माजी नॅशनल उपाध्यक्ष सचिन कुर्तीकर आणि सचिन देसाई, विविध लोम अध्यक्ष, झोन गव्हर्निंग बोर्ड सदस्य तसेच जेसीआय परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमानंतर जेसीआय खेडने हा यशाचा टप्पा संघभावना, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सदस्यांच्या अथक योगदानामुळे शक्य झाला असून भविष्यातही विकासासाठी हे प्रयत्न अधिक जोमाने सुरू राहतील. अशी माहिती अध्यक्ष जेएफडी अमर दळवी यांनी दिली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg