loader
Breaking News
Breaking News
Foto

महायुतीचे सतीश चिकणे यांचा प्रभाग ६ मधून उमेदवारी अर्ज दाखल

खेड (प्रतिनिधी) - खेड नगर परिषद निवडणुकीत महायुतीकडून मोठी हालचाल पाहायला मिळाली असून प्रभाग क्रमांक ६ मधून महायुतीचे उमेदवार सतीश उर्फ पप्पू चिकणे यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी ते दाखल झाले, तेव्हा कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने संपूर्ण परिसरात निवडणुकीचे वातावरण पाहावयास मिळत होते. महिला, युवक आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून आली. अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पप्पू चिकणे यांनी प्रभागातील विकासाला गती देणे, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि प्रलंबित स्थानिक प्रश्न मार्गी लावणे हे आपल्या कामकाजाचे प्रमुख केंद्र राहणार असल्याचे सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रामाणिक व जिद्दीने कार्य करू, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या उमेदवारी अर्जानंतर प्रभाग क्रमांक ६ मधील निवडणुकीत रंगत वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. अर्ज दाखल करण्यासाठी अ‍ॅड. संदेश चिकणे, तुषार साप्ते, शहरप्रमुख कुंदन सातपुते, राजेश बुटाला यांच्यासह प्रभागातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. दरम्यान, दीपक जगताप, दत्ताराम चिकणे, दत्ताराम निकम, प्रशांत निकम, विलास देवळेकर, पंकज दिवटे, कल्पेश बेंडखळे, निकेत तटकरी, विशाल राऊत, अमित बद्रिके, संकेत मोरे, परेश सकपाळ, नागभूषण शेणॉय, संकेत पवार, मिलिंद पवार, शुभम पवार, प्रितम पवार, रत्नदिप (बंड्या) पवार, मया पवार, दिलीप शिगवण आणि दीपक चव्हाण यांनीही उपस्थित राहून पप्पू चिकणे यांना उत्साहपूर्ण पाठिंबा दर्शवला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg