loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती ’बालदिन’ म्हणून उत्साहपूर्ण वातावरणात साजरी

खेड - शुक्रवार दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडमध्ये देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती ’बालदिन’ म्हणून उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. प्रथमतः शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, उच्चमाध्यमिक विभागप्रमुख राहुल गाडबैल, माध्यमिक विभागप्रमुख शैलेश देवळेकर, प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शाळेतील शिक्षिका सुप्रिया रांगले व स्वाती गिल्डा यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या महान जीवनकार्याची महती सांगितली. याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांचे मुलांबद्दलचे असणारे प्रेम, देश स्वातंत्र करण्यासाठी आणि स्वतंत्र झालेल्या देशाला प्रगत बनवण्यासाठी त्यांचे प्रयत्न याविषयी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले.

टाइम्स स्पेशल

संपूर्ण शाळेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील पूर्वप्राथमिक विभागातील पृथा मंडपे, रिमांश राठोड, अनन्या शेनॉई विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गोड खाऊ व भेटवस्तू देण्यात आल्या. बालदिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी शुभेच्छापत्रे, चित्रे रेखाटून, बालदिन साजरा केला. यावेळी आनंद सर्व मुलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी पंडित जवाहरलाल यांच्या जयंतीच्या कार्यक्रमास व सर्व विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg