loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड नगराध्यक्षपदासाठी आघाडीतर्फे सपना कानडे यांचा आज अर्ज भरणार

खेड(प्रतिनिधी)- नगर परिषद निवडणुकीसाठी उबाठा राष्ट्रवादी (शरद पवार)- मनसे राष्ट्रवादी (अजित पवार) महाविकास आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी सपना ऋषिकेश कानडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. उबाठाच्या मशाल चिन्हावर त्या लढणार आहेत. त्या १७ नोव्हेंबर रोजी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. शेवटच्या क्षणी नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करणाऱ्या महाविकास आघाडीकडून काही ठिकाणी त्या-त्या पक्षाच्या तर इतर ठिकाणी उबाठाच्या मशाल चिन्हावर लढण्याची रणनीती आखण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिवसेना-भाजप महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) दूरच ठेवण्यात आले आहे. यामुळे राष्ट्रवादीने महाविकास आघाडीत सहभाग घेण्याचा एकमुखी निर्णय घेत उमेदवारही निवडणूक आखाड्यात उतरवण्याची तयारी केली आहे. महाविकास आघाडीकडून नगरसेवकपदाच्या उमेदवारांची नावेही अजूनही गुलदस्त्यातच ठेवली आहेत. नगराध्यक्षपदासाठीही शेवटच्या क्षणी उमेदवाराचे नाव निश्चित करण्याची खेळी महाविकास आघाडीने केली आहे.

टाइम्स स्पेशल

मनसेचे शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे यांच्या पत्नी सपना कानडे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निवडणुकीत मनसेच्या वाट्याला चार जागा आल्या आहेत. या चारही जागांवर मनसे महाविकास आघाडीकडून मशाल पेटवणार आहे. याच रणनीतीचा अवलंब दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसही करणार आहे. यामागचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. महायुतीकडून शिवसेनेच्या माधवी बुटाला यांनी यापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीकडून सोमवारी सपना कानडे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या दरम्यान महाविकास आघाडीकडून शक्तीप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. आघाडीत आणखी एक घटक पक्षही सामील होणार असल्याचे समजते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg