loader
Breaking News
Breaking News
Foto

बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळविलेल्या अभूतपूर्व विजयाचा आनंद बांदा भाजप मंडळात जल्लोषात साजरा

बांदा (प्रतिनिधी) - बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळविलेल्या अभूतपूर्व विजयाचा आनंद आज बांदा भाजप मंडळात जल्लोषात साजरा करण्यात आला. मंडळाच्या वतीने आयोजित या विजयी उत्सवात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. यावेळी भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत, बांदा सरपंच अपेक्षा नाईक, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य वसंत राऊळ, मंडळ अध्यक्ष स्वागत नाटेकर, मंडळ सरचिटणीस मधु देसाई, तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते दादू कविटकर आणि मंदार कल्याणकर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच बांदा उपसरपंच आबा धारगळकर, महिला मोर्चा मंडल अध्यक्षा रुपाली शिरसाट, मानसी धुरी, तनुजा वराडकर, तसेच कार्यकर्ते आत्माराम गावडे, शैलेश केसरकर, सिद्धेश महाजन, सिद्धेश पावसकर, संदीप बांदेकर, विनेश गवस, आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत जल्लोष व्यक्त केला. बिहारमधील यशामुळे स्थानिक पातळीवरही उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg