loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये महायुतीमधील भाजपा उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल

खेड (प्रतिनिधी) - नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना महायुतीतर्फे खेड शहरातील प्रभाग क्रमांक २ आणि ७ मधील अधिकृत उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया उत्साहात पार पडली. दोन्ही प्रभागांतील उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती जाणवली. प्रभाग क्रमांक २ मधील महायुतीमधील भाजपाचे अधिकृत उमेदवार रहिम युसूफ सहिबोले व प्रभाग क्रमांक ७ मधील स्वप्नाली राकेश चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हा उमेदवारी अर्ज दाखल करताना भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, शिवसेना शहरप्रमुख कुंदन सातपुते यांच्यासह भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान महायुतीचे ऐक्य आणि ताकद स्पष्टपणे दिसून आली. नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दाखवलेली एकजूट आणि सक्रियता पाहता या निवडणुकीत महायुती जोरदार तयारीत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप महायुतीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर महायुतीतर्फे नगराध्यक्षपदासाठी पहिला अर्ज शिवसेनेच्या माधवी बुटाला यांनी दाखल केला. हा अर्ज भरताना शिवसेना व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनुपस्थिती दर्शवल्याने तर्कवितर्क लढवले जात होते. अखेर भाजपच्या पदरात पडलेल्या ३ जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी हजेरी लावल्याने तर्कवितर्काना पूर्णविराम मिळाला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg