loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी शहरात बिबट्याचे दर्शन; वनविभागाकडून शोध मोहीम

​सावंतवाडी: सावंतवाडी शहरातील टोपीवाला तांत्रिक विद्यालय परिसरात, भर वस्तीमध्ये नागरिकांना बिबट्या दिसून आल्याने गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मोठी खळबळ उडाली. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिस स्टेशनच्या अगदी जवळ असलेल्या टोपीवाला तांत्रिक महाविद्यालयाच्या मागच्या बाजूने बिबट्याने शहरातील समाज मंदिर परिसरात प्रवेश केला, अशी माहिती आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या दोन नागरिकांनी बिबट्याला प्रत्यक्ष पाहिले आणि तात्काळ वनविभागाला याबाबत कळवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​नागरिकांच्या सतर्कतेनंतर वनविभागाने तात्काळ ॲक्शन घेत जलद कृती दलाच्या पथकाद्वारे आधुनिक नाईट व्हिजन ड्रोनच्या साहाय्याने बिबट्याचा कसून शोध घेतला. परंतु, आश्चर्य म्हणजे, परिसरामध्ये कुठेही बिबट्या आढळून आला नाही. रात्री उशिरापर्यंत परिसरात कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज मोठ्या प्रमाणावर सुरू होता, ज्यामुळे बिबट्याच्या उपस्थितीची शक्यता व्यक्त होत आहे.

टाइम्स स्पेशल

या घटनेनंतर सावंतवाडी वनविभागाने परिसरातील नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सावंतवाडी वनविभागाचे वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी सांगितले की, प्रत्यक्ष दोन लोकांनी बिबट्या पाहिल्याचे सांगण्यात येत असले तरी वन विभागाच्या जलद कृती दलाला तो कुठेच दिसून आला नाही. तरीसुद्धा वन विभागाकडून परिसरामध्ये खबरदारी घेण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg