loader
Breaking News
Breaking News
Foto

शिक्षक/कर्मचारी नाट्यस्पर्धेत एकनाथ पाटील प्रथम

खेड (प्रतिनिधी) - शिक्षणातील गुणवत्ता संवर्धनासाठी आणि शिक्षकांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी शैक्षणिक वर्ष २०२५/२६ पासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच डायटचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धातंर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुकास्तरावर नाट्य अभिनय स्पर्धेचे आयोजन नवभारत हायस्कूल भरणे नाका, खेड येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सवेणी नं.१ या शाळेचे पदवीधर शिक्षक एकनाथ आनंदराव यांच्या यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांनी नटसम्राट नाटकातील एकपात्री नाट्यप्रयोग सादर केला. यामध्ये त्यांनी सादर केलेला अभिनय इतका जीवंत आणि हृदयस्पर्शी होता की सर्वांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. त्यांच्या अद्वितीय अभिनयामुळे त्यांना या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्यामुळे त्यांची जिल्हास्तरीय नाट्य अभिनय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. त्यांच्या स्पर्धेतील या यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्राबरोबर अभिनय क्षेत्रातूनही अनेकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल. एकनाथ आनंदराव पाटील यांनी सर्वांचे धन्यवाद मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg