loader
Breaking News
Breaking News
Foto

बिहारच्या विजयाने भाजपा नेते व कार्यकर्त्यांचा दापोलीत जल्लोष

संगलट, खेड (इक्बाल जमादार) - बिहार विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या दणदणीत विजयामुळे दापोलीत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. या विजयाबद्दल दापोली केळसकर नाका या ठिकाणी भाजपाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाई वाटून कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. याप्रसंगी बोलताना तालुकाध्यक्ष जया साळवी म्हणाल्या, हा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखालील 'राष्ट्र प्रथम' या संकल्पनेला जनतेने दिलेला कौल आहे. मत चोरीचा खोटा नरेटिव्ह पसरवणारे या निकालामुळे उघडे पडले आहेत. समाजातील सर्वात वंचित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे पक्षाचे ध्येय सातत्याने यशस्वी होत आहे, याचे हे द्योतक आहे. आजचा या निकालाने मनस्वी आनंद होत असल्याचे नमूद केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्रामध्येही सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंत्री नितेश राणे यांच्या सक्षम आणि दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यकर्त्यांना सतत प्रेरणा मिळत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी निवडणुकांत विकासाचे पर्व वेगाने पुढे जाणार असल्याचा विश्वास याप्रसंगी त्यांनी व्यक्त केला. बिहार निकालाचा अश्वमेध महाराष्ट्रात देखील दिसेल. या निकालातून सर्व कार्यकर्त्यांनी प्रेरणा घेऊन जोमाने कामाला लागावे असे सांगितले.

टाईम्स स्पेशल

याप्रसंगी भाजप दापोली तालुकाध्यक्ष जया साळवी, भाजप रत्नागिरी उत्तर जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम इदाते, भाजप रत्नागिरी उत्तर जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस प्रसाद मांडवकर, भाजप दापोली शहराध्यक्ष अतुल गोंदकर, राकेश माळी, सुरेश मिसाळ, मयुरेश वेल्हाळ, वैष्णवी वेल्हाळ, रमेश लाड, सागर गोसावी, कुणाल जाधव, सतिष धाडवे, अमोल चोरगे, नवनाथ जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg