loader
Breaking News
Breaking News
Foto

आजपासून स्वयंभू श्री शिंगेश्वर मंदिर शिरशिंगेत हरिनामाचा गजर घुमणार

दापोली (प्रतिनिधी) - दापोली तालुक्यातील शिरशिंगे येथे पांडवकालीन स्वयंभू श्री शिंगेश्वर देवस्थान आहे. श्री महादेवाचे हे मंदीर गावाच्या एका बाजूला तळ्याच्या काठावर वसलेले आहे. अशा या मंदिराच्या ठिकाणी वारुळे होती. ही वारुळे एका गाईने आपल्या शिंगाने फोडली, त्यातून श्री महादेवाची पिंडी बाहेर आली.गाईने वारुळे फोडली म्हणून या देवस्थानाला शिरशिंगे नाव पडले अशाप्रकारची आख्यायिका प्रसिद्ध असलेल्या या देवस्थानवरुनच गावाचे नावही शिरशिंगे झाले असे सांगितले जाते. असे हे देवस्थान भक्तांच्या हाकेला सत्वर धावून जाणारे असल्याने या देवस्थानावर केवळ शिरशिंगे येथील गावकऱ्यांचीच श्रध्दा आहे, असे नव्हे तर दापोली आणि खेड तालुक्यातील तमाम लोकांचे हे भक्तीस्थान आहे. त्यामुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तगणांची संख्या खुप मोठी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भाविक भक्तगणांचे श्रध्दास्थान असलेल्या या मंदिरात अगदी दरवर्षी उत्पत्ती एकादशी निमित्त मोठ्या उत्साहात हरी जागराचा शिवनाम सप्ताह साजरा केला जातो. त्या प्रमाणे यावर्षीही उत्पत्ती एकादशी निमित्त मिती कार्तिक कृष्णपक्ष शके १९४७ शनिवार १५ नोव्हेंबर २०२५ ते रविवार १६ नोव्हेंबर दरम्यानच्या काळात आयोजित करण्यात आला आहे. रुद्राभिषेका पासून सुरू होणारा हा कार्यक्रम सोहळा उत्तरोत्तर चांगलाच रंगणार आहे. शनिवारी १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पालखीचे आगमन होणार असून त्यानंतर रात्रौ ९.३० ला वारकरी संप्रदाय आणि ग्रामस्थ मंडळाच्या दिंडयांचे भक्तिभावाने हरिनामाचा गजर करत मंदिरात आगमन होईल, रात्रौ ९.३० ते ११ वाजता खेड येथील सुप्रसिद्ध हरिभक्त परायण विलास मोरे महाराज यांच्या सृश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम, रात्रौ ११ नंतर पंचक्रोशीतील दिंडी भजनाचे कार्यक्रम तर रात्रौ जागर सांप्रदायिक भजन मंडळ ग्रामस्थ सुकदर, गावतळे, पन्हाळेदुर्ग, पिसई आणि देवसडे यांचा हरिनामाचा गजर घुमणार आहे.

टाईम्स स्पेशल

तर दुसऱ्या दिवशी रविवारी १६ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ ते ६ वाजता काकड आरती ह.भ.प.प्रकाश कोळंबे महाराज सुकदर, सकाळी ६ ते ७ पालखी प्रदक्षिणा, सकाळी ७ ते ७.३० वाजता संत मंडळी चे आभाराचा कार्यक्रम, सकाळी ८ ते १० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, सकाळी १० ते ११ आरती व तिर्थ प्रसाद , दुपारी १२ ते २ महाप्रसाद तसेच दुपारी ३ वाजता भजनांच्या कार्यक्रमाने उत्सव कार्यक्रम सोहळ्याची सांगता होणार आहे. अशाप्रकारचा भरगच्च कार्यक्रम श्री शिंगेश्वर ग्रामस्थ मंडळ शिरशिंगे मुंबई मंडळ तसेच महिला मंडळ, शिरशिंगे यांनी आयोजित केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg