loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूण मध्ये नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसचे लियाकत शाह यांचा उमेदवारी अर्ज दाखल

संगलट (खेड)( इक्बाल जमादार) - चिपळूण नगर परिषद निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलेले लियाकत शहा यांनी आज नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर लियाकत शहा यांनी येऊ घातलेल्या निवडणुकीत विकास, पारदर्शकता आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. शहरातील वाढत्या समस्या, पायाभूत सुविधांची गरज आणि स्वच्छ व सक्षम प्रशासन देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. चिपळूण नगर परिषद निवडणुकीत आता कॉंग्रेसकडून अधिकृत उमेदवार मैदानात उतरल्यामुळे निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg