loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रीवर्धन नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक: नागराध्यक्ष पदासाठी एकूण 5 तर नगरसेवक पदासाठी 68 उमेदवारी अर्ज दाखल

श्रीवर्धन (विजय गिरी) - श्रीवर्धन नगरपरिषदेची 2025 सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असुन उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 3 वाजेपर्यंत थेट नगराध्यक्ष पदासाठी एकूण 5 अर्ज प्राप्त झाले असुन दहा प्रभागातून 20 नगरसेवक पदांसाठी एकूण 68 अर्ज दाखल झाले आहेत. या निवडणूकसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजपा युती असुन या युतीचे नगराध्यक्ष पदासाठी जितेंद्र सातनाक यांचा अर्ज दाखल करण्यात आला. शिवसेना उबाठा गटाकडून अतुल चौगुले यांनी शिवसेना पक्षाकडून अक्षता प्रीत्तम श्रीवर्धनकर, राष्ट्रवादी शरद पवार गटा कडून रवींद्र चौलकर, तर अपक्ष रामचंद्र घोडमोडे यांनी अर्ज दाखल केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नागराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा युती कडून जितेंद्र सातनाक यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी श्रीवर्धन च्या आमदार तथा राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे स्वतः उपस्थित होत्या. त्यांच्या सोबत सुभाष केकाने, तालुकाध्यक्ष दर्शन विचारे आदी मान्यवर उपस्थित होते. शिवसेना पक्षांकडून नगरध्यक्ष पदासाठी अक्षता श्रीवर्धनकर यांचा व नगरसेवक पदासाठी उमेदवारंचा अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, तालुका प्रमुख, व मान्यवर उपस्थित होते. उबाठा शिवसेना पक्षांकडून नगरध्यक्ष पदासाठी अतुल चौगुले यांचा अर्ज दाखल करण्यासाठी मान्यवर उपस्थित होते. रवींद्र चौलकर यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व मान्यवर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

तर अपक्ष रामचंद्र घोडमोडे यांचा अर्ज दाखल करण्यासाठी त्यांचे समर्थक, मोठया संख्येने सोबत होते. सर्वच राजकीय पक्षाने तसेच अपक्ष उमेदवारांनी आपआपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यापूर्वी शहाराची ग्रामदेवता सोमजाई देवीच्या मंदिरात जावून दर्शन घेऊन तेथून नगरपरिषद कार्यालयापर्यंत पायी शक्ती प्रदर्शन करत वाजत गाजत अर्ज दाखल केले. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीवर्धन चे तहसीलदार महेंद्र वाकलेकर काम पाहत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg