loader
Breaking News
Breaking News
Foto

कर्ज फेडता न आल्याने बोरघर येथील इसमाची नैराश्यातून आत्महत्या

खेडे (वार्ताहर):- तालुक्यातील बोरघर- ब्राह्मणवाडी येथील सुधीर लक्ष्मण पार्टे (वय-४५) यांनी अडीच लाखाचे कर्ज फेडता न आल्याने नैराश्यातून दि. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या मुदतीत गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत सुधीर लक्ष्मण पार्टे यांनी सुमारे वर्षभरापूर्वी कर्ज म्हणून घेतलेले सुमारे अडीच लाख रुपये फेडता न आल्याने नैराश्यातून स्वत:च्या राहत्या जुन्या घरातील हॉलच्या माळ्यास असलेल्या लाकडी भालाला ओढणीने बांधून त्या ओढणीचा फास गळ्यात अडकवून गळफास घेऊन आत्महत्या केली. खेड पोलिसांनी आमृ. क्रमांक १११/२०२५, बी. एन. एस.एस. १९४ प्रमाणे नोंद केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg