loader
Breaking News
Breaking News
Foto

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते महाराष्ट्र दालनाचे थाटात उद्घाटन

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील स्टार्टअप्स, बचत गट आणि 'एक जिल्हा एक उत्पादन' यांसारख्या उद्योगांना व्यापार वाढीसाठी कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले. ४४ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाच्या उद्घाटनाप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे सांगितले. या मेळाव्यात महाराष्ट्राला भागीदार राज्याचा विशेष दर्जा देण्यात आला असून, हे दालन राज्याच्या विकासाला नव्या दिशा देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रगती मैदान येथे आयोजित या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे उद्घाटन केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते झाले. त्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र दालनाचे थाटात उद्घाटन केले. या प्रसंगी त्यांनी दालनातील सहभागी स्टॉलधारकांशी संवाद साधला आणि त्यांच्या उत्पादनांची उत्सुकतेने माहिती घेतली. "राजधानीत अशा मोठ्या मेळाव्यात महाराष्ट्र दालनाची उभारणी राज्य आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. यामुळे स्टार्टअप्सना गती मिळेल, गुंतवणुकीला चालना मिळेल आणि बचत गटांना प्रोत्साहन मिळेल," असे सामंत म्हणाले. तसेच, सरकारकडून उचलण्यात येणाऱ्या आवश्यक पावलांची माहितीही त्यांनी माध्यमांना दिली.

टाइम्स स्पेशल

या उद्घाटन सोहळ्यात उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र सदनचे सचिव तथा निवासी आयुक्त आर. विमला, व्यवस्थापकीय संचालक विवेक पानसरे आणि सहव्यवस्थापकीय संचालक प्रशाली दिघावकर यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात झारखंडला फोकस राज्याचा दर्जा देण्यात आला असून, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि राजस्थान या चार राज्यांना भागीदार राज्य म्हणून विशेष दर्जा प्राप्त झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg