loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या कळंबट शाखाप्रमुख पदी रुपेश रहाटे

दापोली ( प्रतिनिधी ) - कळंबट गावात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शाखाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आलेल्या रुपेश रहाटे यांचे शिवसेना नेते आमदार भास्करशेठ जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. दापोली तालुक्यातील कळंबट हे गाव राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते. अशा या गावात या आधी उपशाखा प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या रुपेश रहाटे यांच्यावर विश्वास दाखवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने शाखाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रुपेश रहाटे यांच्यावर विश्वास दाखवून शिवसेना शाखा प्रमुख पदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे. एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या रहाटे यांचे समाजमान्य चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व निश्चितपणे शाखाप्रमुख पदाला न्याय देवून शिवसेना पक्षाला अपेक्षित असलेले संघटनात्मक कार्य यशस्वीपणे पार पाडतील असा विश्वास व्यक्त करत शिवसेना शाखा प्रमुख रुपेश रहाटे यांचे शिवसेना नेते आमदार भास्करशेठ जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन संघटनेचे काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

टाइम्स स्पेशल

यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर, उत्तर रत्नागिरीचे शिवसेना जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव, जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव, शिवसेना महिला आघाडीच्या उप जिल्हा संघटीका मानसी विचारे, तालुका संपर्क प्रमुख रविंद्र धाडवे, तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, सरचिटणीस नरेंद्र करमरकर, अडखळ आंजर्ले (जुईकर मोहल्ला) पंचायत समिती गणाचे विभाग प्रमुख तृशांत भाटकर, परशुराम दळवी, माजी नगराध्यक्षा ममता मोरे, सिंधू भाटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg