loader
Breaking News
Breaking News
Foto

बांदा परिसरात स्थिरावलेल्या ओंकार हत्तीच्या हल्ल्यात गाभण म्हैशीचा मृत्यू

बांदा (प्रतिनिधी) - बांदा परिसरात गेले काही दिवस स्थिरावलेल्या ओंकार हत्तीने वाफोली आईरवाडी येथील मंगेश उत्तम आईर यांच्या मालकीच्या गाभण म्हशीवर बांदा तुळसाण पुलानजीक नारळ फोफळीच्या बागेत हल्ला करत तिला ठार केली. यामध्ये आईर यांचे ७५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून वनविभागाने घटनेचा पंचनामा केला आहे. ओंकार हत्ती गेले काही दिवस या भागात स्थिरावला आहे. बांदा, इन्सुली, वाफोली गावात त्याचा वावर आहे. भर वस्तीत देखील त्याचा वावर वाढला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ओंकार हत्तीने तुळसाण पुलाखाली असलेल्या आईर यांच्या बागेतील म्हशीच्या गोठ्यात शिरून म्हशीवर हल्ला केला. यामध्ये म्हैस जागीच गतप्राण झाली. बांदा वनपाल प्रमोद राणे, वनरक्षक अतुल पाटील यांच्यासह वनखात्याचे पथक यांनी स्थानिकांसह घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. ओंकार हत्तीचा वावर या परिसरात वाढल्याने स्थानिक शेतकर्‍यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg