loader
Breaking News
Breaking News
Foto

जिंदल विद्यामंदिर येथे स्काऊटस - गाईड्स राज्य पुरस्कार पूर्व चाचणी शिबीर उत्साहात

रत्नागिरी (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील दक्षिण विभागाचे स्काऊट गाईड राज्यपाल पुरस्काराचे एकदिवसीय स्काऊटस - गाईड्स राज्य पुरस्कार पूर्व चाचणी शिबीर जिंदल विद्यामंदिर येथे उत्साहात संपन्न झाले. रत्नागिरी जिल्हा भारत स्काऊट आणि गाईड आयोजित स्काऊटस - गाईड्स राज्य पुरस्कार पूर्व चाचणी शिबीर चाचणी शिबीर जिंदल विद्यामंदिर येथे उत्स्फुर्त प्रतिसादात संपन्न झाले. सदर प्रशिक्षणात राज्यपाल पुरस्कारासाठी आवश्यक प्रविण्यपदकांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यामंदिरचे पर्यवेक्षक दिपक दरडी यांनी उपस्थित मार्गदर्शक व उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत केले. जिल्हा स्काऊट संघटक रमाकांत डिंगणे यांनी प्रस्ताविक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर स्काऊट विभागाचे ट्रेनर शिक्षक दिनेश नाचणकर व एअर स्काऊट मास्टर प्रशांत जाधव यांनी ध्वजारोहण, प्रार्थना, नियम, ध्येय्य, वचन, विविध बांधण्या / गाठी, अंदाज अशा विविध घटकांसंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच गाईड कॅप्टन संजू शर्मा यांनी गाईड ध्वजारोहण तर प्रज्ञा मेढेकर यांनी गाईड प्रविण्यपदके यांविषयी मार्गदशन केले. उपस्थितांपैकी शिर्के प्रशालेच्या नानल गुरुकुल तसेच जिंदल विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी कृतीशील सहभाग नोंदविला. सदर प्रसंगी आभारप्रदर्शन फ्लॉक लीडर मैथिली मोरे यांनी केले. वंदेमातरम राष्ट्रीय गीत गायनाने चाचणी व प्रशिक्षण शिबीराची सांगता करण्यात आली. राज्य पुरस्कार पूर्व चाचणी शिबीराच्या यशस्वीतेसाठी सेविका कांबळे शिक्षक विनोद आदींनी प्रयत्न केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg