loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत 7 वैद्यकीय अधिकारी रुजू

सावंतवाडी : अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्गतफेँ दाखल जनहित याचिकेत शासनाच्यावतीने प्रतिज्ञापत्र दाखल केल्याप्रमाणे सात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयाच्या सेवेत रूजू झाले. नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी यांचे अभिनव फाऊंडेशन, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, युवा रक्तदाता संघ या सामाजिक संस्थांच्यावतीने स्वागत करण्यात आले. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, अभिनव फाऊंडेशनचे खजिनदार जितेंद्र मोरजकर, तुषार विचारे, राजू केळुसकर, किशोर चिटणीस, अमित अरवारी, विनोद वालावलकर, युवा रक्तदाता संघाचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक ज्ञानेश्वर ऐवळे, डॉ. पी.डी.वजराटकर,डॉ. चौगुले, रुग्णालयाचे समुपदेशक सुनील सोन्सुरकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सावंतवाडीकर जनता प्रेमळ आहे. मनापासून सेवा देणा-या कर्मचारी, अधिकारी यांच्या पाठिशी ही जनता नक्की राहते. नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी यांना इथे कसलाही त्रास होणार नाही. उलट काही गैरसोय वाटली तर हक्काने हाक द्यावे. सावंतवाडीतील सर्व संस्था, संघटना आणि नागरिक आपल्या पाठिंशी नक्की राहतील;असा विश्वास अभिनव फाऊंडेशन, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान आणि युवा रक्तदाता संघ यांच्या पदाधिकारी यांनी व्यक्त केला.

टाइम्स स्पेशल

नवनियुक्त डॉ. बाळासाहेब नाईक, डॉ. अलफान आवटे, डॉ. ओंकार कोल्हे, डॉ. विघ्नेश चाकोरे, डॉ.गोपाळ गोटे, डॉ. प्रिया वाडकर, डॉ. क्रांती जाधव, डॉ. श्लोक हिरेमठ, डॉ. टी.कगनुलकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी यांनी ही आपण रुग्णांना चांगली सेवा देऊ असा विश्वास व्यक्त केला. अभिनव फाऊंडेशनतफेँ खजिनदार श्री.मोरजकर, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, श्री.सुर्याजी यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. ऐवळे म्हणाले, अभिनव फाऊंडेशन, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, युवा रक्तदाता संघ यांचे आरोग्यविषयक कार्य उल्लेखनीय आहे. या संस्थांचे नेहमी सहकार्य असते. त्याबद्दल आभारी आहोत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सोन्सुरकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg